राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना घेण्याऐवजी राज ठाकरेंनाच पक्षात का घेत नाही? शिवसैनिकांनी फलक लावून व्यक्त केला संताप

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   शिवसेनेत काही ठिकाणी नव्या नियुक्त्यांवरुन अंतर्गत वाद पेटू लागलाय. घाटकोपसारख्या ठिकाणी तो शिगेला पोहोचल्याचं झालेल्या फलकबाजीवरुन दिसतंय. घाटकोपरमध्ये नवनिर्माण शिवसेना अशी बॅनरबाजी करण्यात आलीय. ही बॅनरबाजी इतर कोणत्याही पक्षाकडून नाही तर नाराज शिवसैनिकांकडूनच केली गेलीय. बाहेरुन पक्षात आलेल्यांना प्राधान्य दिलं जात असल्याचा आरोप नाराज शिवसैनिकांनी केलाय. 2 दिवसांपूर्वी याच भागात […]

राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना घेण्याऐवजी राज ठाकरेंनाच पक्षात का घेत नाही? शिवसैनिकांनी फलक लावून व्यक्त केला संताप

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

शिवसेनेत काही ठिकाणी नव्या नियुक्त्यांवरुन अंतर्गत वाद पेटू लागलाय. घाटकोपसारख्या ठिकाणी तो शिगेला पोहोचल्याचं झालेल्या फलकबाजीवरुन दिसतंय. घाटकोपरमध्ये नवनिर्माण शिवसेना अशी बॅनरबाजी करण्यात आलीय. ही बॅनरबाजी इतर कोणत्याही पक्षाकडून नाही तर नाराज शिवसैनिकांकडूनच केली गेलीय.

बाहेरुन पक्षात आलेल्यांना प्राधान्य दिलं जात असल्याचा आरोप नाराज शिवसैनिकांनी केलाय. 2 दिवसांपूर्वी याच भागात शिवसैनिक आमने सामने आले होते. मात्र, शिवसेनेचे विभागप्रमुख राजेंद्र राऊत यांनी उपऱ्यांना पदं दिल्याचा इंकार करत काही विरोधकांनी फलक झळकावल्याचा प्रत्यारोप केलाय.

राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना घेण्याऐवजी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनाच पक्षात का घेत नाहीं? असा सवाल या  होर्डिंगच्या माध्यमातून करण्यातून आलाय. या होर्डिंगमुळे पक्षातील नाराजी उघड झालीय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number