जय महाराष्ट्र न्यूज, नांदेड
नांदेड महापालिकेच्या प्रचारासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सभा घेतली
उद्धव ठाकरेंच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे
– सरकार वाचवणारे अदृष्य हात शरद पवार आणि काँग्रेसचे
– विकासबरोबर प्रकाशही गायब
– तुम्ही अंगावर येणार असाल तर शिवसेना शिंगावर घेण्यास तयार
– यांचा पक्ष चंद्रावरही सर्वात मोठा, मंगळावरुनही यांना मिस्ड कॉल येतात, आम्हाला मेंबर करा
– जगातील सर्वात मोठा पक्ष, पण त्यांच्याकडे स्वतःच्या निष्ठावान उमेदवारांची कमतरता
– जगातील सर्वात मोठा पक्ष, पण त्यांच्याकडे स्वतःच्या निष्ठावान उमेदवारांची कमतरता
– भाजपच्या लाटेतसुद्धा शिवसेना पक्ष निवडून येतोय
– जगात मोठा पक्ष, देशात मोठा, राज्यात मोठा पक्ष आणि आता तर चंद्रावर मोठा पक्ष म्हणे
– देशात सध्या कुठेही दिवाळी दिसत नाही; पंतप्रधानाना दिवाळी कुठे दिसली माहिती नाही
– तुम्ही चोरुन पाठिंबा घेता, आम्ही उघड सत्तेत सामील झालो, विरोधही उघडपणे करतो
– मोफत विज देण्यापेक्षा आधिक विज दया
– नोटबंदी काय, जीएसटी काय वाटले ते सरकार करतयं
– कोपर्डीचे प्रकरणचे काय झाले, फक्त गाजर दाखवले
– फक्त मेणबत्त्या पेटवू नका, तर जे अत्याचार करतात त्यांना पेटवा
– पाठीवर वार करणारी आमची अवलाद नाही
– गुजरातच्या निवडणुका दोन महिन्यांवर आल्यानंतर मोदींना शाळा आठवली
– कर्जमाफी अद्याप ऑनलाईनमध्ये अडकली आहे, जून 2017 पर्यंतचं कर्ज माफ झालंच पाहिजे