जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या दादरमध्येच मनसेने शिवसेनेवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला आहे.
दादरमध्ये कोळी महिलांनी मोर्चा काढलाय. मनसेनं या कोळी महिलांना पाठिंबा दिलाय.
खांडगे इमारतीजवळ शिवसेनेनं स्वस्त दरात मासेविक्री सुरु केलीय. त्यामुळे पूर्वीपासून असलेल्या कोळी महिलांच्या व्यवसायावर परिणाम होतोय.
यासाठी कोळी महिलांनी पालिकेवर मोर्चा काढलाय. याला मनसेने पाठिंबा दर्शवला.