जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई स्वबळाची तुतारी फुंकत पुढे सरसावलेल्या शिवसेनेसाठी एक चांगली बातमी. मुंबई मनपातील मनसेचे सहा नगरसेवक आता शिवसेनेचे झालेत. कोकण आयुक्तांनी या सहा नगरसेवकांच्या शिवसेना प्रवेशास मान्यता दिली आहे. त्यामुळे मनपा सभागृहातील शिवसेनेचं संख्याबळ आता 93 झालंय.