शिवसेना आमदारानेच उचलला राजदंड

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई अंगणवाडी सेविकांनी संप करू नये यासाठी त्यांना महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा कायदाच्या (मेस्मा) कक्षेत आणण्याचा निर्णय राज्य सरकारने काही दिवसांपूर्वीच घेतला होता. अंगणवाडी सेविकांवर लावण्यात आलेल्या मेस्माच्या मुद्यावरून विधानसभेत मोठा गदारोळ झाला आहे. अंगणवाडी सेविकांवरचा ‘मेस्मा’ रद्द करा, अशी मागणी करत शिवसेना आमदार बॅनर घेऊन थेट वेलमध्येच उतरले. तर धराशिवचे सेना आमदार […]

शिवसेना आमदारानेच उचलला राजदंड

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

अंगणवाडी सेविकांनी संप करू नये यासाठी त्यांना महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा कायदाच्या (मेस्मा) कक्षेत आणण्याचा निर्णय राज्य सरकारने काही दिवसांपूर्वीच घेतला होता.

अंगणवाडी सेविकांवर लावण्यात आलेल्या मेस्माच्या मुद्यावरून विधानसभेत मोठा गदारोळ झाला आहे. अंगणवाडी सेविकांवरचा ‘मेस्मा’ रद्द करा, अशी मागणी करत शिवसेना आमदार बॅनर घेऊन थेट वेलमध्येच उतरले. तर धराशिवचे सेना आमदार ज्ञानराज चौगुले यांनी थेट राजदंडच उचलला. या सर्व प्रकारानंतर विधानसभेत मोठा गोंधळ सुरू झाला आहे.

अगोदरही विरोधकांकडून विधानसभेतील राजदंड उचलण्याच्या घटना घडल्या आहेत. परंतु आता सत्ताधारी शिवसेनेच्या आमदारानेच असं कृत्य केल्याने आश्चर्य व्यक्त होतंय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number