जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
शिवसेनेत लवकरच संघटनात्मक पातळीवर बदल होणार आहेत. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनानिमीत्त शिवसेना पक्षाची एक बैठक गोरेगांव मध्ये संपन्न होणार आहे.
या बैठकीत उद्धव ठाकरे यांची पुन्हा एकदा पक्षप्रमुखपदी फेर नियुक्ती केली जाणार आहे. याशिवाय युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचीही नेतेपदी वर्णी लागणार आहे. आदित्य ठाकरे नेते झाले तर थेट पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारणीमध्ये सहभागी होतील.
तर, ठाणे जिल्ह्यात भगवा डौलाने फडकवून पक्ष अधिक मजबूत केला म्हणून पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचंही प्रमोशन होणार आहे.
एकनाथ शिंदे यांचीही नेतेपदी हमखास वर्णी लागणार असल्याची माहिती सुत्रांनी दिलीये. तर आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या अष्टप्रधान मंडऴात येणार असल्याने मनोहर जोशी आणि सुधीर जोशी यांना अष्टप्रधान मंडळातुन डच्चू मिळणार असुन त्यांना सल्लागार म्हणुन नेमलं जाणार असल्याची माहिती जय महाराष्ट्रच्या सुत्रांनी दिलीये.