जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
कोकण रिफायनरी पेट्रोकेमिकल प्रकल्पाला विरोध करण्यासाठी आज संघर्ष समितीच्या वतीने मुंबईत मोर्चा काढण्यात आला.
या मोर्चाला शिवसेनेचे खासदार विनायक राऊत उपस्थित होते. उद्योगमंत्री आणि शिवसेनेचे नेते सुभाष देसाई यांनी या प्रकल्पाच्या अध्यादेशाला मंजुरी दिली होती.
पण मोर्चात विनायक राऊत उपस्थित राहिल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या.