आगामी लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्ष आपल्या उमेदवारांची यादी जाहीर करत आहेत. गुरुवारी भाजपाने आपली पहिली उमेदवार यादी जाहीर केल्यानंतर आज शिवसेनेने 21 उमेदवारांची यादी जाहीर केली. यावेळी शिवसेनेने बहुतांश ठिकाणी विद्यामान खासदारांना उमेदवारी दिली आहे. मात्र उस्मानाबाद येथील खारदाराला पुन्हा उमेदवारी देण्यात आली नाही. पालघर आणि साताऱ्यात सस्पेन्स कायम ठेवण्यात आला आहे. तसेच नरेंद्र पाटील यांनी आज उद्धव ठाकरे यांची भेट घेतली असून त्यांना साताऱ्यातून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.
दक्षिण मुंबई- अरविंद सावंत
कल्याण- श्रीकांत शिंदे
रायगड- अनंत गिते
रत्नागिरी सिंधुदूर्ग- विनायक राऊत
कोल्हापूर- संजय मंडलिक
हातकणंगले- धैर्यशिल माने
नाशिक- हेमंत गोडसे
शिर्डी- सदाशिव लोखंडे
शिरूर- शिवाजीराव आढळराव-पाटील
औरंगाबाद- चंद्रकांत खैरे
वाशीम- भावना गवळी
रामटेक- कृपाल तुमाणे
अमरावती- आनंदराव अडसूळ
परभणी- संजय जाधव
उस्मानाबाद- ओमराजे निंबाळकर
हिंगोली- हेमंत पाटील