गाईला जपायचं आणि ताईला झोडायचं; हे कोणत हिंदुत्त? – उद्धव ठाकरे

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई  शिवतीर्थ अर्थात शिवाजी पार्कवर शिवसेना दसरा मेळावा पार पडला आहे. शिवसेनेचे मंत्री, खासदार, आमदार  तसेच दिग्गज नेते या मेळाव्याला उपस्थित  होते.  याशिवाय युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे तसेच तेजस ठाकरे देखील व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. GST, नोटाबंदी, हिंदूत्व अशा विविध मुद्द्यावरुन उद्धव ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधला. […]

गाईला जपायचं आणि ताईला झोडायचं; हे कोणत हिंदुत्त?  – उद्धव ठाकरे

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई 

शिवतीर्थ अर्थात शिवाजी पार्कवर शिवसेना दसरा मेळावा पार पडला आहे. शिवसेनेचे मंत्री, खासदार, आमदार  तसेच दिग्गज नेते या मेळाव्याला उपस्थित  होते. 

याशिवाय युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे तसेच तेजस ठाकरे देखील व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. GST,

नोटाबंदी, हिंदूत्व अशा विविध मुद्द्यावरुन उद्धव ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधला.

 

उद्धव ठाकरेंच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे

– आधी महिलांचे रक्षण मग, आरक्षण

– चणे देणार पण दात पाडणार? हा कोणता कारभार

– गाईला जपायचं आणि ताईला झोडायचं; हे कोणत हिंदुत्व?

– शेंडी, जानवंवालं हिंदुत्व सेनेला मान्य नाही

– सौभाग्य योजना म्हणजे गोर-गरीबांची थट्टा

– राजकारणासाठी हिंदुत्व फोडायचं काम करु नका

– सर्जीकल स्ट्राईकनंतर दहशतवादी हल्ले वाढले

– सैन्य दुबळा नाही, सेनापती दुबळा आहे

– त्रास देण्याशिवाय मोदी सरकारने सर्वसामान्यांना काय दिलं?

– नोटाबंदीसारखी हिंमत काश्मीरच्या विशेष राज्याचा दर्जा काढण्यासाठी दाखवाल का? उद्धव ठाकरेंचा सवाल

– नोटाबंदी करुनही काळा पैसा आणि भ्रष्टाचार अजूनही देशात तसाच आहे

– विकासदर घसरला, 15 लाख लोकांच्या नोकऱ्या गेल्या याला जबाबदार कोण?

– नोटबंदी विरोधात शिवसेना सर्वप्रथम रस्त्यावर उतरली

– नोटाबंदी कशासाठी झाली, कुणासाठी झाली, काहीही माहिती नाही

– जीएसटीवेळी सेनेने भूमिका लावून धरली नसती, तर महापालिकांचं महसूल बुडालं असतं

– भाजपवाले म्हणतात, ‘वंदे मातरम्’ न बोलणं हा देशद्रोह नाही

– देशाची ओळख ‘हिंदुस्थान’ व्हावी म्हणून भाजपशी युती केली

– किमान 5 जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवा

– बुलेट ट्रेनच्या नावाने आमच्या खांद्यावर मोदींचं ओझं टाकू नका

– संपूर्ण देशात कारभाराचं चिखल झालंय

– कमळ नाही तर सर्वत्र फक्त मळ दिसतोय

– शिवसैनिक ही मला मिळालेली वडिलोपार्जित शस्त्रं 

– इकडे सत्ता, तिकडे सत्ता, पण कारभार बेपत्ता – उद्धव ठाकरे

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number