आज रात्री होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी दादर येथील शिवाजी पार्कवर शिवसैनिकांची गर्दी जमली आहे.
दरम्यान, शिवाजी पार्कवर जमलेल्या शिवसैनिकांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
या दसरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज काय बोलणार याकडे राज्यातील राजकीय वर्तुळाचे तसेच सर्वसामान्यांचे लक्ष लागले आहे.
या मेळाव्यात संजय राऊत यांची सरकारवर जोरदार टीका
- 2019 मध्ये शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार – संजय राऊत
- भंपकपणाचं राज्य सुरू आहे – संजय राऊत
- संपूर्ण अयोध्या उद्धव ठाकरेंची वाट पाहत आहे – संजय राऊत
- राम मंदीराबाबत फसवाफसवी सुरु – संजय राऊत
उद्धव ठाकरेंच्या भाषणाला सुरुवात
- देशातला हिंदू मेलेला नाही तो अजूनही जागा आहे – उद्धव ठाकरे
- दरवर्षी रावण उभा राहतो पण राम मंदिर उभं राहत नाही – उद्धव ठाकरे
- ‘मला कोणी राजकारण शिकवण्याच्या फंदात पडू नका’ – उद्धव ठाकरे
- सरकारच्या कारभारावर बोलायचं नाही तर आरत्या ओवाळायच्या? – उद्धव ठाकरे
- कोणतेही ग्रह सरळ करण्याची शिवसेनेत ताक – उद्धव ठाकरे
- कर्नाटकी सरकारचं उद्धव ठाकरेंकडून कौतुक
- ‘विष्णूचा अवतार असूनही महागाई रोखता येत नाही’ – उद्धव ठाकरे