जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं श्रेय शिवसेनेनं घेतले. गेल्या 10 वर्षांपासून कर्जमाफीसाठी शिवसेना आंदोलनात अग्रेसर आहे.
कर्जमाफीचा विषय शिवसेनेने उचलला, शेतकरी एकजूट झाला, त्यामुळे कर्जमाफी मिळाली असं उद्धव ठाकरेंनी म्हटले.
तसेच शेतकऱ्यांची कर्जमाफी फॅशन मानणाऱ्यांनांही कर्जमाफी करावी लागली, असा टोलाही उद्धव ठाकरेंनी लगावला.
दरम्यान, कर्जमाफी झाली, आता किती शेतकऱ्यांचा सातबारा खरंच कोरा होणार आहे.
या कर्जमाफीचा फायदा किती आणि कुणाला होणार आहे किती शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार याची यादी आणि विभागवारी वर्गवारी जाहीर करा, अशी मागणी उद्धव
ठाकरेंनी केली.
तसेच 29 जूनला उद्धव ठाकरे स्वत: मराठवाड्यात येऊन याची तपासणी करणार आहेत.