जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
गणेशोत्सवावरून शिवसेना भाजपात वादाची ठिणगी पडली आहे.
दहीहंडी उत्सव आणि गणेशोत्सव मुंबईकरांना योग्य प्रकारे साजरा करता यावा यासाठी भाजपने कंबर कसली.
पारंपारिक सण योग्य प्रकारे मुंबईकरांना साजरे करता यावेत ही भाजपची भूमिका आहे.
तर, दुसरीकडे मुंबईतल्या सायलेंस झोनबद्दल सरकारनं ठोस भूमिका घ्यावी, नाही तर सायलेंस झोनमध्येच गणेशोत्सव साजरा करणार, असा इशारा शिवसेनेनं दिला
आहे.