कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेना-भाजप पुन्हा एकदा आमने सामने

जय महाराष्ट्र न्यूज, कल्याण   कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेना-भाजप पुन्हा एकदा आमने सामने आल्याच पाहायला मिळाले. भाजप सभापती खुशबू चौधरी यांनी  प्रभाग अधिकारी अमित पंडीत व डोंबिवलीचे नगररचनाकार सुरेंद्र टेंगळे यांच्या विरोधात एक दिवसापूरती निलंबनाची मागणी केली. मागणी मान्य नसेल तर महासभा तहकूब करा असं देखील त्यांचं म्हणण होतं. मात्र, महापौर राजेंद्र देवळेकर यांनी त्यांच्या […]

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेना-भाजप पुन्हा एकदा आमने सामने

जय महाराष्ट्र न्यूज, कल्याण

 

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेना-भाजप पुन्हा एकदा आमने सामने आल्याच पाहायला मिळाले.

भाजप सभापती खुशबू चौधरी यांनी  प्रभाग अधिकारी अमित पंडीत व डोंबिवलीचे नगररचनाकार सुरेंद्र टेंगळे यांच्या विरोधात एक दिवसापूरती निलंबनाची मागणी केली. मागणी मान्य नसेल तर महासभा तहकूब करा असं देखील त्यांचं म्हणण होतं.

मात्र, महापौर राजेंद्र देवळेकर यांनी त्यांच्या मागणीला दाद दिली नाही. कल्याण  डोंबिवली महापालिकेतील फ प्रभागात होत असलेल्या बेकायदा बांधकाम प्रकरणी खुशबू चौधरींनी ही मागणी केल्याचं समोर येत आहे.  भाजप सदस्यांनी महासभेचे कामकाज रोखून धरण्यासाठी सभागृहात जय श्रीराम, मोदी, गणपती बाप्पा मोरया अशा घोषणा दिल्या. त्याला शिवसेनेच्या महिला सदस्यांनी मंदिर वही बनायेंगे मगर तारीख नही बतायेंगे अशा घोषणाबाजींनी प्रत्युत्तर दिले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number