Homeमहाराष्ट्र पंतप्रधान मोदी आणि भाजपचा बालेकिल्ला असलेल्या गुजरातमध्ये शिवसेना उभे करणार उमेद्वार
पंतप्रधान मोदी आणि भाजपचा बालेकिल्ला असलेल्या गुजरातमध्ये शिवसेना उभे करणार उमेद्वार
वृत्तसंस्था, गुजरात गुजरात विधानसभा निवडणुकीत आधीच काँग्रेसच्या आव्हानामुळे हैराण झालेल्या भाजपसमोर आता शिवसेनेचं आव्हान उभं ठाकलंय. भाजपचा बालेकिल्ला असलेल्या गुजरातमध्ये शिवसेनेने 40 जागा लढण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे शिवसेनेच्या या राजकीय खेळीमुळे हिंदूत्ववादी मतांमध्ये फूट पडून गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपला फटका बसण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविलीये. शिवसेना नगरसेविका राजूल पटेल आणि हेमराज शहा यांच्या नेतृत्वाखालील एक […]
गुजरात विधानसभा निवडणुकीत आधीच काँग्रेसच्या आव्हानामुळे हैराण झालेल्या भाजपसमोर आता शिवसेनेचं आव्हान उभं ठाकलंय.
भाजपचा बालेकिल्ला असलेल्या गुजरातमध्ये शिवसेनेने 40 जागा लढण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे शिवसेनेच्या या राजकीय खेळीमुळे हिंदूत्ववादी मतांमध्ये फूट पडून गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपला फटका बसण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविलीये.
शिवसेना नगरसेविका राजूल पटेल आणि हेमराज शहा यांच्या नेतृत्वाखालील एक टीम आज गुजरातला जाणार आहे. यावेळी ते गुजरातमधील राजकीय परिस्थिती आणि लढवण्यात येणाऱ्या जागांचा आढावा घेणार आहेत.