Homeमहाराष्ट्र शिवसेना कार्यकर्त्यांनी तरुणाला नग्न करून झोडपले
शिवसेना कार्यकर्त्यांनी तरुणाला नग्न करून झोडपले
वृत्तसंस्था, नवी दिल्ली राजस्थानमध्ये मुस्लीम युवकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हिंदू महिलेबरोबर हॉटेलमध्ये गेलेल्या मुस्लीम युवकाला जबर मारहाण करण्यात आल्याचं कळतंय. शिवसेना कार्यकत्यांनी अक्षरश: नग्न करून या युवकाला मारहाण केली. या मारहाणीत युवक गंभीर जखमी झाला. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.