शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा सलग दुसऱ्या दिवशी स्थगित

अकृषी विद्यापीठ आणि महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी सलग दुसऱ्यादिवशी महाराष्ट्र राज्य विद्यापीठ आणि महाविद्यालयीन सेवक संयुक्त कृती समितीतर्फे आंदोलन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर परीक्षा कामकाजावर परिणाम झाला आहे. त्यामुळे शिवाजी विद्यापीठाच्या हिवाळी सत्रातील शुक्रवारी आणि शनिवारी होणाऱ्या सर्व परीक्षा स्थगित करण्यात आल्या आहेत, अशी माहिती शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह […]

शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा सलग दुसऱ्या दिवशी स्थगित

अकृषी विद्यापीठ आणि महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी सलग दुसऱ्यादिवशी महाराष्ट्र राज्य विद्यापीठ आणि महाविद्यालयीन सेवक संयुक्त कृती समितीतर्फे आंदोलन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर परीक्षा कामकाजावर परिणाम झाला आहे. त्यामुळे शिवाजी विद्यापीठाच्या हिवाळी सत्रातील शुक्रवारी आणि शनिवारी होणाऱ्या सर्व परीक्षा स्थगित करण्यात आल्या आहेत, अशी माहिती शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव यांनी पत्रकाद्वारे दिलीआहे.

विद्यापीठाच्या हिवाळी सत्रातील अभ्यासक्रमाच्या परीक्षा विविध परीक्षा केंद्रांवर सुरू आहेत. मात्र, विद्यापीठ आणि महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संघटनेने गेल्या काही वर्षांपासून आपल्या मागण्यांबाबत पाठपुरावा सुरू केला आहे . मात्र, त्या अद्यापही विद्यापीठ प्रशासन व राज्य शासनाने मान्य केलेल्या नाहीत. शिवाजी विद्यापीठाच्या हिवाळी सत्रातील परीक्षांच्या पार्श्वभूमीवर सेवक संघासह संयुक्त कृती समितीने आंदोलनाचे हत्यार उगारले आहे.

कृती समिती व मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यात मागण्यांबाबत चर्चा झाली. मात्र, तोडगा न निघाल्याने शिवाजी विद्यापीठ सेवक संघाने संप सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आंदोलनाचा फटका परीक्षांना बसला आहे. तीन दिवस परीक्षा स्थगित झाल्याने त्या कधी होणार, याबाबत विद्यापीठ प्रशासनाने जाहीर केलेले नाही. त्यामुळे विद्यार्थी संभ्रमावस्थेत आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number