जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
शिवजयंती अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलीय. 19 तारखेला सरकारी पातळीवर साजरी करणार आहे. पण ज्या शिवाजी पार्कला शिवतिर्थ हे नाव मिळालं त्या शिवतिर्थावरील महाराजांचा 1966 ला उभारलेल्या पुतळ्याची दुरावस्था झालीय आणि याकडे जबाबदारी असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाचं दुर्लक्ष असल्याचं समोर येतय.
या पुतळ्याचा रंग निघला असून पापुद्रेसुद्धा निघालेयत. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभाग या सगळ्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येतय.
शिवतिर्थावरील महाराजांच्या पुतळ्याची दुरवस्था तर आहेत शिवाय या स्मारका शेजारी कचऱ्याचं देखील साम्राज्य पसरलय.
महापौरांनी या पुतळ्याची पाहणी करून आणि दागदुजी, साफसाफाईचे आदेश महापालिकेला दिलेयत.