शिवरायांचा आग्र्यातला पराक्रम पुन्हा उजळणार

शिवरायांचा आग्र्यातला पराक्रम पुन्हा उजळणार आहे. कारण, यंदाची शिवजयंती आग्र्यात साजरी करण्यास पुरातत्व खात्याने परवानगी दिली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना, ‘यंदाची शिवजयंती आग्र्यातील लाल किल्ल्यावर साजरी होणार आहे’, अशी माहिती दिली आहे. ‘१६६६ मध्ये, औरंगजेबाने शिवाजी महाराजांना भेटण्यास नकार दिल्यामुळे शिवाजी महाराजांचा अवमान झाला होता, त्याच दिवाणात यावर्षी शिवजयंती साजरी होणार […]

शिवरायांचा आग्र्यातला पराक्रम पुन्हा उजळणार

शिवरायांचा आग्र्यातला पराक्रम पुन्हा उजळणार आहे. कारण, यंदाची शिवजयंती आग्र्यात साजरी करण्यास पुरातत्व खात्याने परवानगी दिली आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना, ‘यंदाची शिवजयंती आग्र्यातील लाल किल्ल्यावर साजरी होणार आहे’, अशी माहिती दिली आहे. ‘१६६६ मध्ये, औरंगजेबाने शिवाजी महाराजांना भेटण्यास नकार दिल्यामुळे शिवाजी महाराजांचा अवमान झाला होता, त्याच दिवाणात यावर्षी शिवजयंती साजरी होणार आहे ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे’, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. या सोहळ्यास युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही उपस्थित राहणार आहेत, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
या कार्यक्रमाला पुरातत्व खात्याने परवानगी नाकारली होती. मात्र, याविरोधात अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठान आणि आर. आर. पाटील फाउंडेशनचे अध्यक्ष विनोद पाटील यांनी दिल्ली न्यायालयात धाव घेतली. यासंदर्भात निकाल देताना न्यायालयाने राज्य सरकार सहआयोजक असल्यास आग्रा किल्ल्यात शिवजयंती साजरी करण्याची परवानगी मिळेल, असा निर्णय दिला होता. तसेच, पुरातत्व खात्याला राज्य सरकारने पत्र पाठवून आपण सहआयोजक आहोत असे कळवले. त्यानंतरही परवानगी नाकारली गेल्यास याचिकाकर्ते पुन्हा कोर्टात येऊ शकतात, असेही स्पष्ट केले होते.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number