नवीन राजवाड्यात शिवराज्याभिषेक सोहळा

रायगडावर ३५० व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याची लगबग गेले अनेक दिवस सुरु असून आज तारखेनुसार हा सोहळा पार पडत आहे. संभाजीराजे रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करत आहेत. तर, दुसरीकडे कोल्हापूरला नवीन राजवाड्यात शाहू महाराज, मालोजीराजे आणि संपूर्ण छत्रपती घराण्यातील सदस्यांच्या उपस्थितीत शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होणार आहे. कोल्हापुरात आज नवीन राजवाड्यावर पहिल्यांदाच शिवराज्याभिषेक सोहळा पार पडत आहे. हा […]

नवीन राजवाड्यात शिवराज्याभिषेक सोहळा

रायगडावर ३५० व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याची लगबग गेले अनेक दिवस सुरु असून आज तारखेनुसार हा सोहळा पार पडत आहे. संभाजीराजे रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करत आहेत. तर, दुसरीकडे कोल्हापूरला नवीन राजवाड्यात शाहू महाराज, मालोजीराजे आणि संपूर्ण छत्रपती घराण्यातील सदस्यांच्या उपस्थितीत शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होणार आहे. कोल्हापुरात आज नवीन राजवाड्यावर पहिल्यांदाच शिवराज्याभिषेक सोहळा पार पडत आहे. हा सोहळा दिमाखदार पद्धतीने साजरा होत आहे. सकाळी साडेसात वाजल्यापासून या सोहळ्याला सुरुवात झाली आहे. या ठिकाणी खूप मोठ्या संख्येने शिवभक्त उपस्थितराहिले असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णमूर्तीवर अभिषेक करण्यात येतोय.

दरवर्षी जुन्या राजवाड्यात साध्या पद्धतीने शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होत होता. मात्र, यावर्षीपासून नवीन राजवाड्यावर खूप मोठ्या उत्साहात शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते सोहळा होणार आहे. शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी माजी खासदार राजू शेट्टी हे उपस्थित राहणार आहेत. छत्रपती मालोजीराजे, मधुरीमारजे, यशस्वीनिराजे, यशराजे आदीसह शिवभक्त उपस्थित असणार आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number