रायगडावर तारखेनुसार शिवराज्याभिषेक सोहळा

तारखेनुसार छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्यभिषेक सोहळा साजरा होत आहे. ६ जून १६७४ रोजी म्हणजेच ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी या दिवशी विधीपूर्वक राज्याभिषेक होऊन शिवराय छत्रपती झाले. किल्ले रायगडावर न भूतो न भविष्यति असा झालेला ‘शिवराज्याभिषेक सोहळा’ पार पडला. ही इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिलेली घटना होती. आज ६ जून रोजी तारखेनुसार ३५० वा शिवराज्यभिषेक सोहळा साजरा केला जात […]

रायगडावर तारखेनुसार शिवराज्याभिषेक सोहळा

तारखेनुसार छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्यभिषेक सोहळा साजरा होत आहे. ६ जून १६७४ रोजी म्हणजेच ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी या दिवशी विधीपूर्वक राज्याभिषेक होऊन शिवराय छत्रपती झाले. किल्ले रायगडावर न भूतो न भविष्यति असा झालेला ‘शिवराज्याभिषेक सोहळा’ पार पडला. ही इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिलेली घटना होती. आज ६ जून रोजी तारखेनुसार ३५० वा शिवराज्यभिषेक सोहळा साजरा केला जात आहे. यंदा २ जून रोजी तिथीनुसार आणि ६ जून रोजी तारखेनुसार शिवराज्याभिषेकाला ३४९ वर्षे पूर्ण होऊन ३५० वं वर्ष सुरु होत आहे.

शिवरायांच्या स्वराज्याच्या ध्येयासाठी सुरू झालेल्या लढ्यातला आजच्या दिवशी मोठा टप्पा पार पडला. शिवाजी महाराजांचा आजच्या दिवशी राज्याभिषेक झाला. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शालिवाहन शके १५९६ म्हणजेच ६ जून १६७४ ला शिवराज्यभिषेक सोहळा पार पडला आणि रयतेचे लाडके शिवबा छत्रपती झाले आणि रयतेला वाली मिळाला. भारताच्य इतिहासातील हा फार मोठा दिवस आहे. स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची किर्ती सर्वदूर पसरली असल्यामुळे, देशासह विदेशातही आज शिवराज्यभिषेक सोहळ्याचा उत्साह पाहायला मिळत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number