भाजपाविरोधात मंगळवारी शिवसेनेचा हल्लाबोल

‘आम्ही खूप सहन केले आहे तर आता आम्हीच बर्बाद करणार आहोत. डोक्यावरून खूप पाणी गेले आहे? आता बघाच’, अशा शब्दात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपला टोला लगावला आहे. मंगळवारी शिवसेना खासदार संजय राऊत शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेणार आहेत. यावेळी शिवसेनेच्या संपूर्ण पक्षासह पदाधिकारी, सर्व आमदार, खासदार उपस्थित होणार आहेत. तसेच मी आताच बोलणार […]

भाजपाविरोधात मंगळवारी शिवसेनेचा हल्लाबोल

‘आम्ही खूप सहन केले आहे तर आता आम्हीच बर्बाद करणार आहोत. डोक्यावरून खूप पाणी गेले आहे? आता बघाच’, अशा शब्दात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपला टोला लगावला आहे.

मंगळवारी शिवसेना खासदार संजय राऊत शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेणार आहेत. यावेळी शिवसेनेच्या संपूर्ण पक्षासह पदाधिकारी, सर्व आमदार, खासदार उपस्थित होणार आहेत. तसेच मी आताच बोलणार नाही, सर्व गोष्टींवर उद्या उत्तरे आपल्याला मिळणार आहेत, असे संजय राऊत म्हणाले.

संजय राऊत म्हणाले, भाजपचे साडे तीन लोक हे त्याच कोठडीत असणार आहेत. महाराष्ट्रात शिवसेनेच्या नेतृत्वातले सरकार आहे. त्यांची झोप उडाली आहे. जे करायचे ते करा आता मी घाबरणार नाही, असे संजय राऊतांनी म्हटले आहे.

राऊतांनी उल्लेख केलेले ते भाजपाचे साडेतीन लोक कोण असतील याबाबत सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. दरम्यान, भाजप नेते मोहित कंबोज यांनी संजय राऊतांवर टीका केली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number