अजित पवारांच्या येण्यानं शिवसेना अस्वस्थ ?

मुंबई, ४ जुलै २०२३, प्रतिनिधी:  महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक नाट्यमय घडामोडी घडत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आपल्या ३० पेक्षा अधिक समर्थक आमदारांसह शिंदे फडणवीस यांच्या सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला आणि थेट उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अजित पवार यांच्याव्यतिरिक्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या ८ नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली, मात्र अजित दादांच्या या अचानक एंट्रीमुळे शिंदे […]

अजित पवारांच्या येण्यानं शिवसेना अस्वस्थ ?

मुंबई, ४ जुलै २०२३, प्रतिनिधी:  महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक नाट्यमय घडामोडी घडत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आपल्या ३० पेक्षा अधिक समर्थक आमदारांसह शिंदे फडणवीस यांच्या सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला आणि थेट उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अजित पवार यांच्याव्यतिरिक्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या ८ नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली, मात्र अजित दादांच्या या अचानक एंट्रीमुळे शिंदे गटात मात्र अस्वस्थता वाढल्याचे समोर येत आहे. एका वृत्तवाहिनीने याबाबत वृत्त दिले आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी भूकंप घडणार का अशी शक्यताही निर्माण झाली आहे.

मागच्या वर्षी महाविकास आघाडीतून बाहेर पडताना शिंदेच्या शिवसेनेच्या आमदारांनी अजित पवारांवर ठपका ठेवला होता. अजित पवार आम्हाला निधी देत नाहीत, तसेच आमच्या मतदारसंघात राष्ट्रवादीच्या उमेदवारांना ताकद देतात असा आरोप करत उद्धव ठाकरेंशी फारकत घेतली. मात्र आता शिंदेच्या सरकारमध्ये अजित पवारांना अर्थखाते मिळण्याची शक्यता असल्याने शिवसेनेच्या आमदारांमध्ये अस्वस्थता आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number