‘शिवसेना देणार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा’

येत्या काही दिवासात देशात राष्ट्रपतीपदासाठी निवडणूका पार पडणार असून, द्रौपदी मुर्मू यांना एनडीएकडून उमेदवारी देण्यात आली आहे. तर, विरोधी पक्षाकडून यशवंत सिन्हा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या सर्वामध्ये शिवसेनेकडून भाजपच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याचे जाहीर केले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत याबाबतची घोषणा केली आहे. आदिवासी समाजातील शिवसैनिकांनी विनंती […]

‘शिवसेना देणार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा’

येत्या काही दिवासात देशात राष्ट्रपतीपदासाठी निवडणूका पार पडणार असून, द्रौपदी मुर्मू यांना एनडीएकडून उमेदवारी देण्यात आली आहे. तर, विरोधी पक्षाकडून यशवंत सिन्हा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या सर्वामध्ये शिवसेनेकडून भाजपच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याचे जाहीर केले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत याबाबतची घोषणा केली आहे. आदिवासी समाजातील शिवसैनिकांनी विनंती केल्यानंतर आपण एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देत असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

ठाकरे म्हणाले की, काल खासदारांची बैठक पार पडली. त्यामध्ये आपल्यावर मुर्मू यांना पाठिंबा देण्यासाठी दबाब असल्याच्या चर्चा होत्या. मात्र, असा कोणताही दबाब आपल्यावर नसल्याचे यावेळी उद्धव ठाकरेंनी यावेळी स्पष्ट केले. देशाचा विचार करून द्रौपदी मुर्मूंना पाठिंबा देत असल्याचे ते म्हणाले. पक्षापेक्षा देशहित लक्षात घेऊन निर्णय घेतल्याचेही ते म्हणाले. अनेक शिवसैनिकांनी मला विनंती केली. राज्यात ज्या पद्धतीचे राजकारण सुरू आहे. त्याप्रमाणे मी मुर्मू यांना विरोध करायला हवा होता. कारण त्या भाजपच्या उमेदवार आहेत. मात्र, मी इतक्या छोट्या मनाचा नाही. आदिवासी महिला म्हणून मुर्मू यांना पाठिंबा देत असल्याचे उद्धव ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केले. एक आदिवासी महिला देशाच्या सर्वोच्च पदी विराजमान होत असेल तर आपल्याला आनंद आहे असेही ते म्हणाले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number