शिवसेना कुणाची, धनुष्यबाण कुणाला मिळणार याबाबत आज केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुनावणी सुरु आहे. मात्र, महाराष्ट्रात शिवसेना कुणाची हा प्रश्नच उपस्थित होत नाही. शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचीच आहे, असा दावा आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला.
आज पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले, शिवसेना कुणाची? या तांत्रिक मुद्द्यावर आज केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुनावणी होणार आहे. केंद्रीय निवडणूकआयोगाने ज्या पद्धतीने गेले काही निर्णय दिले, त्याबाबत आमची नाराजी आहे. शिवसेना कुणाची हा प्रश्न महाराष्ट्रात तरी आता विचारला जात नाही. संजय राऊत म्हणाले, देशात शिवसेना एकच आहे आणि ही शिवसेना वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्यानंतर उद्धव ठाकरे यांचीच आहे. त्यांच्याशिवाय शिवसेनेवर कुणीही दावा करु शकत नाही. आम्हाला नक्की न्याय मिळेल. अशी ते म्हणाले आहेत. काय निकाल लागणार या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेतून महाराष्ट्रात १ लाख ३६ हजार कोटींची गुंतवणूक होईल. तसेच, यातून ६६ हजार ५०० रोजगार निर्माण होतील, असा दावा राज्य सरकारने केला आहे. असं त्यांना विचारले असता त्यावर संजय राऊत म्हणाले, राज्यात उद्योग येणार असतील तर स्वागतच आहे. मात्र, केवळ घोषणा करुन काही होणार नाही. उद्योग वास्तवात राज्यात आले. उद्योगांची पायाभरणी, शुंभारंभ झाला व त्यातून रोजगार निर्मिती झाली तरच या दाव्यांना खरे म्हणता येईल. अन्यथा अशा पोकळ घोषणांना अर्थ नाही