मुंबै बँकेवर शिवसेना-राष्ट्रवादीचे वर्चस्व

मुंबै बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडणूक पार पडली असून या निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादीने बाजी मारली आहे. मुंबै बँकेच्या अध्यक्षपदी सिद्धार्थ कांबळे यांची निवड झाली आहे तर भाजपच्या प्रसाद लाड यांना पराभव पत्कारावा लागला आहे. तसेच उपाध्यक्षपदी भाजपाचे विठ्ठल भोसले विजयी झाले आहेत. त्यामुळे मुंबै बँकेचे अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे आणि उपाध्यक्षपद भाजपकडे गेले आहे. मुंबै बँकेच्या […]

मुंबै बँकेवर शिवसेना-राष्ट्रवादीचे वर्चस्व

मुंबै बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडणूक पार पडली असून या निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादीने बाजी मारली आहे. मुंबै बँकेच्या अध्यक्षपदी सिद्धार्थ कांबळे यांची निवड झाली आहे तर भाजपच्या प्रसाद लाड यांना पराभव पत्कारावा लागला आहे. तसेच उपाध्यक्षपदी भाजपाचे विठ्ठल भोसले विजयी झाले आहेत. त्यामुळे मुंबै बँकेचे अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे आणि उपाध्यक्षपद भाजपकडे गेले आहे.

मुंबै बँकेच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीचे सिद्धार्थ कांबळे यांनी ११ विरुद्ध ९ मतांनी विजय मिळवला आहे. मात्र या बँकेच्या निवडणुकीत भाजप नेते प्रवीण दरेकरांना जबर धक्का बसला आहे. उपाध्यक्षपदासाठी उमेदवारांना समान मते मिळाली होती. त्यामुळे ईश्वर चिठ्ठीने निकाल काढण्यात आला असून भाजपचे उमेदवार विठ्ठल भोसले यांची निवड झाली आहे. त्यामुळे अध्यक्षपदावर राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे तर उपाध्यक्षपदी भाजपने बाजी मारली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number