देशामध्ये महागाईचा भडका उडाला आहे. देशातील पेट्रोल-डिझेलसह गॅसच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे वाढत्या महागाई विरोधात शिवसेना आक्रमक झाली आहे. औरंगाबादमध्ये शिवसेना आक्रमक झाली असून शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्यावतीने महागाईविरोधात आक्रोश मोर्च्याला सुरूवात झाली आहे.
शिवसेना नेते संजय राऊत यांच्या नेतृत्वात हा विशाल मोर्चा निघाला आहे. शिवसेनेच्या आक्रोश मोर्चात अल्पवयीन मुलेही सहभागी झाले आहेत. औरंगाबादचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या क्रांती चौकातून हा मोर्चा काढण्यात येत आहे. शेकडो शिवसेना कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले असून हा मोर्चा क्रांती चौकातून गुलमंडीकडे निघाला आहे. देशात पेट्रोल, डिझेल, गॅस, खाद्यतेल आदी सर्वच जीवनावश्यक वस्तूंचे दर प्रचंड प्रमाणात वाढले असून याकरिता केंद्रे सरकार जबाबदार असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे.
देशात महागाईचा प्रचंड भडका उडाला आहे. प्रत्येक गोष्टींसाठी ग्राहकांना जास्तीचे पैसे मोजावे लागत आहे. सामान्यांच्या खिशाला कात्री लागत आहे. त्यामुळे वाढत्या महागाई विरोधात औरंगाबादमध्ये शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या नेतृत्वात शिवसेना आक्रमक झाली असून आक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे.