शिवसेनेचे उपनेते रघुनाथ कुचिक यांच्यावर पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका २४ वर्षीय तरुणीला जीवे मारण्याची धमकी देत गर्भपात केल्याचा गुन्हा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
२४ वर्षीय तुरुणीला लग्नाचे आमिष दाखवून एका तुरणीशी शारिरीक संबंध ठेवून तिला गरोदर करण्यात आले. त्यानंतर त्या तरुणीचे गर्भपात करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी त्या तरुणीने रघुनाथ कुचिक यांच्याविरोधात शिवाजी नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. या फिर्यादीमध्ये हा प्रकार ६ नोव्हेंबर २०२० ते १० फेब्रुवारी २०२२ दरम्यान घडल्याचने नमूद करण्यात आले आहे. पुणे, गोवा याठिकाणी मोठमोठ्या हॉटेल्समध्ये हा सर्व प्रकार घडला आहे.
याप्रकरणी पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आयपीसी ३७६, ३१३, ५०६नुसार गुन्हा दाखल कला आहे. तसेच पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहे. ज्येष्ठ नेत्याच्या नावे बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यामुळे खळबळ उडाली आहे.