नाशिकमध्ये शिवसेना नगरसेवकांची ‘सेंच्युरी’ नक्की; संजय राऊतांचा दावा

  महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये शिवसेना खासदार संजय राऊत यांनी तयारीला सुरूवात केली असून नाशिकमध्ये शिवसेनेच्या विजयाचा दावा राऊतांनी केला आहे.   ‘नाशिकमध्ये महापालिका निवडणूकीसाठी १००च्या खाली नगरसेवक देणार नाही असे इथले नेते सांगतात. मात्र जेवढे द्याल तेवढे कमीच आहेत. इथला प्रत्येक माणूस १० नगरसेवकांचा मालक आहे. त्यामुळे आपली सेन्च्यूरी नक्की आहे,’ असा विश्वास राऊत […]

नाशिकमध्ये शिवसेना नगरसेवकांची ‘सेंच्युरी’ नक्की; संजय राऊतांचा दावा

  महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये शिवसेना खासदार संजय राऊत यांनी तयारीला सुरूवात केली असून नाशिकमध्ये शिवसेनेच्या विजयाचा दावा राऊतांनी केला आहे.

  ‘नाशिकमध्ये महापालिका निवडणूकीसाठी १००च्या खाली नगरसेवक देणार नाही असे इथले नेते सांगतात. मात्र जेवढे द्याल तेवढे कमीच आहेत. इथला प्रत्येक माणूस १० नगरसेवकांचा मालक आहे. त्यामुळे आपली सेन्च्यूरी नक्की आहे,’ असा विश्वास राऊत यांनी नाशिकमध्ये व्यक्त केला आहे.

  नाशिकमध्ये शिवसैनिकांनी अनेकांना जमिनीवर आणण्याची आवश्यकता आहे. या पेक्षाही मोठा कार्यक्रम झाला असता. परंतु पोलिसांनी परवानगी दिली नाही. अमरावतीमध्ये झालेल्या हिंसाचारामुळे नाशिकमध्ये मोठा कार्यक्रम घेण्यास परवानगी मिळाली नाही. अमरावतीत जे झाले ते नाशिकमध्ये कधीच होणार नाही, असा विश्वासही संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. तसेच शेतकऱ्यांच्या संघर्षापुढे सरकारला झुकावे लागले असून शेतकऱ्यांसाठी हा खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य दिन आहे. शेतकऱ्यांनी हे स्वातंत्र्य लढून मिळवले आहे, असा टोलाही संजय राऊतांनी लगावला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number