एका जागेसाठी शिवसेनेनं युती तोडली होती – संजय राऊत

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजप 240 आणि शिवसेनेला 48 जागा देणार असल्याचे विधान केले. मात्र, बावनकुळेंच्या या विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटले. दरम्यान, यावरून उद्धव गटाचे नेते संजय राऊत यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. ‘ज्या शिवसेनेने एका जागेसाठी युती तोडली होती, त्या 40-45 जणांवर तुकडे फेकलेले आहेत. यांना आयुष्यभर तुकडेच फेकले […]

एका जागेसाठी शिवसेनेनं युती तोडली होती – संजय राऊत

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजप 240 आणि शिवसेनेला 48 जागा देणार असल्याचे विधान केले. मात्र, बावनकुळेंच्या या विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटले. दरम्यान, यावरून उद्धव गटाचे नेते संजय राऊत यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

‘ज्या शिवसेनेने एका जागेसाठी युती तोडली होती, त्या 40-45 जणांवर तुकडे फेकलेले आहेत. यांना आयुष्यभर तुकडेच फेकले जातील. ते तुकडे तोंडात ठेवूनच चघळत त्यांना जगावं लागेल. तसेच शिवसेनेला कुठलाही स्वाभिमान उरला नसल्याची टीका संजय राऊत यांनी केली आहे.’

संजय राऊत म्हणाले, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सांगतात शिवसेनेला 40 जागा देऊ, 25 जागा देऊ. उद्याच्या काळत मोजून पाच जागा शिवसेनेच्या तोंडावर फेकतील. म्हणून भाजपा-शिवसेना तोडली ही यासाठीच. त्यांना महाराष्ट्रतील शिवसेनेचा रुबाब, दरारा संपवायचा होता तसेच महाराष्ट्राचा स्वाभिमान तोडायचा होता म्हणून शिवसेना तोडली असे राऊत म्हणाले. त्यामुळे आता खरी शिवसेना कोणती याचा निर्णय जनता करेल, असेही ते म्हणाले.

चंद्रशेखर बावनुकळे काय म्हणाले?

मुंबईमध्ये भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा प्रसिद्धीप्रमुखांची बैठक पार पडली. याबैठकीत चंद्रशेखर बावनकुळे यांनी 2024च्या विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपाबाबत भाष्य केलं. यावेळी बोलताना आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला 48 जागा देणार असल्याचे वक्तव्य केलं. तसेच भाजपा 240 जागा लढवणार असल्याचेही ते म्हणाले. मात्र, बावनकुळेंच्या वक्तव्यामुळे वाद होण्याची शक्यता असल्यामुळे प्रसारमाध्यमांवरील बावनकुळेंचा व्हिडिओ हटवण्यात आला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number