नाशकात राऊतांवर नाराज शिवसैनिक शिंदे गटात

नाशिकमधील गळती थांबवण्यासाठी उद्धव गटाचे प्रमुख स्वतः मैदानात उतरणार आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकमध्येच सत्तांतराच्यावेळी शिवसेनेला पहिला दगाफटका बसला होता. आता हीच गळती रोखण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाने नाशकात पुन्हा पायाभरणी सुरु केली आहे. सत्तांतरादरम्यान ठाकरे गटातील निकटवर्तीय आणि बरेचसे जवळचे शिवसैनिक शिंदे गटात सामील झाले. नाशिकमधूनच […]

नाशकात राऊतांवर नाराज शिवसैनिक शिंदे गटात

नाशिकमधील गळती थांबवण्यासाठी उद्धव गटाचे प्रमुख स्वतः मैदानात उतरणार आहेत.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकमध्येच सत्तांतराच्यावेळी शिवसेनेला पहिला दगाफटका बसला होता. आता हीच गळती रोखण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाने नाशकात पुन्हा पायाभरणी सुरु केली आहे.

सत्तांतरादरम्यान ठाकरे गटातील निकटवर्तीय आणि बरेचसे जवळचे शिवसैनिक शिंदे गटात सामील झाले. नाशिकमधूनच दोन आमदार, एक खासदार, काही माजी खासदार आणि शहरातील १२ माजी नगरसेवक तसेच काही पदाधिकारी शिंदे गटात गेले. त्यामुळे एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला असणाऱ्या नाशिकमध्ये पुन्हा संघटना बांधणी करण्याची गरज निर्माण झाली आहे. यासाठी आता थेट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे स्वतः नाशिकमध्ये जाहीर सभा घेणार आहेत. जानेवारीच्या अखेरीस किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात उद्धव ठाकरे नाशिकमध्ये सभा घेणार आहेत, अशी माहिती मिळाली आहे.
येत्या काळात कधीही महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका होण्याची शक्यता असल्याने, ठाकरे गट जोमाने तयारीला लागला आहे. नाशिकमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाची ताकद वाढवण्यासाठी आता स्वतः उद्धव ठाकरे यांना मैदानात उतरावं लागलं आहे. तसेच, उद्धव ठाकरेंच्या मेळाव्याच्या तयारीसाठी संजय राऊत नाशिकला भेट देणार आहेत, अशी माहिती मिळाली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number