शिवसेना नेते पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे १५ जून रोजी अयोध्या दौऱ्याला जाणार आहेत. आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याआधी शिवसैनिक अयोध्येकडे रवाना झाले आहेत. राज्यभरातून रेल्वेमार्गे शिवसैनिक अयोध्याला जात आहेत.
१५ जून रोजी आदित्य ठाकरे यांचा अयोध्य दौरा आहे. तसेच त्याच दिवशी आदित्य ठाकरे शरयूतीरी आरती करणार असल्याची माहिती सेना प्रवक्ते संजय राऊत यांनी दिली आहे. आदित्य ठाकरे यांच्या या दौऱ्यामध्ये त्यांच्यासोबत संजय राऊत यांच्यासह शिवसेनेचे नेते, पदाधिकारी देखील असणार आहेत.
‘जय श्रीराम. १५ जून चलो अयोध्या… आदित्य ठाकरे शेकडो शिवसैनिकांसह अयोध्येला येणार. रामलल्लाचे दर्शन घेणार.” असं संजय राऊत यांनी ट्वीट केलं होतं. दरम्यान, आदित्य ठाकरे यांचा अयोध्या दौरा एका दिवसावर येऊन ठेपला असून शिवसैनिक अयोध्येकडे रवाना झाले आहेत.