तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा

मुंबई, २ जून २०२३, प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराज हे अवघ्या महाराष्ट्रासाठी मानाचं पान आहे. कुशल प्रशासक म्हणून त्यांच्याकडे आजही पाहिलं जातं. त्यामुळे या आदर्शव्रत व्यक्तीकडे पाहण्याचा अंदाज देखील शिवभक्तांसाठी खास आहे. शिवरायांच्या जयंती, पुण्यतिथी प्रमाणेच त्यांच्या राज्याभिषेकाचा सोहळा देखील शिवभक्त साजरा करतात. हिंदू कॅलेंडरनुसार, शिवाजी महाराजांनी ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी दिवशी आपला राज्याभिषेक करून घेतला आहे. […]

तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा

मुंबई, २ जून २०२३, प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराज हे अवघ्या महाराष्ट्रासाठी मानाचं पान आहे. कुशल प्रशासक म्हणून त्यांच्याकडे आजही पाहिलं जातं. त्यामुळे या आदर्शव्रत व्यक्तीकडे पाहण्याचा अंदाज देखील शिवभक्तांसाठी खास आहे. शिवरायांच्या जयंती, पुण्यतिथी प्रमाणेच त्यांच्या राज्याभिषेकाचा सोहळा देखील शिवभक्त साजरा करतात. हिंदू कॅलेंडरनुसार, शिवाजी महाराजांनी ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी दिवशी आपला राज्याभिषेक करून घेतला आहे. त्यामुळे दरवर्षी शिवभक्त तिथीनुसार आणि तारखेनुसार देखील शिवराज्याभिषेक दिन साजरा करतात.

यंदा तिथी नुसार राज्याभिषेक दिन २ जून दिवशी साजरा केला जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते ध्वजपूजन करण्यात आले. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याचं यंदाचे ३५० वे वर्ष आहे. किल्ले रायगडावर राज्याभिषेक सोहळ्याचे औचित्य साधून दिमाखदार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. तसेच, राज्यातील राजकारणात भेटीगाठी सुरु आहेत.

यंदाचा राज्याभिषेकोत्सव दिन खास असण्यामागील कारण म्हणजे हा ३५० वा राज्याभिषेक दिन आहे. त्यामुळे शिवभक्तांसोबतच राज्य सरकार कडून देखील हा सोहळा भव्य स्वरुपात साजरा केला जाणार आहे. रायगडावर त्यानिमित्त भव्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. राज्य शासनाच्या वतीनं आयोजित या सोहळ्याला गुरुवारी शिर्काईमातेच्या पूजनानं सुरुवात झाली. त्यानंतर दिवसभरात रायगडावरील गंगासागर तलाव आणि विविध देवदेवतांचं पूजन करण्यात आलं. शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्तानं रायगडावर ५ आणि ६ जून या कालावधीत अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number