जय महाराष्ट्र न्यूज, औरंगाबाद
राज्यभर आज शिवजयंती साजरी करण्यात येत आहे. अनेक ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. मुंबईच्य़ा शिवाजी पार्क येथे शिवजयंती साजरी करण्यात येत आहे. केवळ महाराष्ट्रात नाही तर दिल्लीमध्येही शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात येतेय.
शिवजयंतीच्या पूर्व संध्येला औरंगाबादेत आकर्षक लायटिंग आणि लखलखत्या दिव्यांचा दीपोत्सव साजरा करण्यात येतोय. क्रांती चौकातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याभोवताली दिवे पेटवत शिव जयंती उत्सवाला सुरुवात करण्यात आली. दिव्यांच्या लख्ख प्रकाशाने क्रांती चौक आणि शिव स्मारक उजळून निघाला. जवळपास 5 हजार दिवे यावेळी शिवप्रेमींनी लावून दिपोत्सव साजरा केला. या दिव्यासोबत संपूर्ण परिसर ‘शिवाजी महाराज की जय’ घोषणांनी दुमदुमला.