आर आर पाटील फाउंडेशनचे विनोद पाटील यांनी यंदा आग्र्याच्या किल्ल्यामध्ये शिवजयंती साजरी करण्याची परवानगी मागितली होती. मात्र, पुरातत्व खात्याने त्याला आक्षेप घेतला होता. पण, त्यांना त्यात यश मिळाल आणि शनिवारी शिवाजी महाराज यांची ३९३ वी जयंती आग्र्यात साजरी केली जात आहे. या जयंतीला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उत्तर प्रदेश चे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे उपस्थित असणार आहेत.
संध्याकाळी दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित दिवान ए आम लाल किल्ला इथे जयंती उत्सव आणि सांस्कृतिक कार्यक्रम ही होणार आहेत. आग्रा किल्ल्यासमोर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला रविवारी सकाळी अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाला शेकडो नागरिक उपस्थित आहेत. आग्रा आणि परिसरात व्यवसायनिमित्त स्थायिक झालेल्या मराठी कुटुंबांनी कार्यक्रमाला हजेरी लावली.
मराठी गाणी, झेंडे आणि टोप्या घातलेल्या मराठी बांधवांनी शिवरायांचा चौकात जयघोष केला. या सोहळ्यासाठी आग्रा शहरात हिंदी आणि मराठी फलक लावण्यात आले आहेत. शिवसेनेचे भगवे झेंडे धनुष्यबाण चिन्हासह रस्त्याच्या दुतर्फा लावण्यात आले आहेत.