शिवला मिळाली त्याची ड्रीम गर्ल?

मुंबई, २५ एप्रिल २०२३, प्रतिनिधी : रिअॅलिटी शो बिग बॉसचे कलाकार हे शो संपल्यानंतरही चर्चेत असतात. अलीकडेच बिग बॉस चा १६ वा सिझन संपला. हा सिझन देखील खूप गाजला. बिग बॉस मधील मंडळीला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.अशातच सध्या सोशल मीडियावर अभिनेता शिव ठाकरेशी संबंधित व्हिडिओ व्हायरल होत आहे. शिव लवकरच रोहित शेट्टीच्या ‘खतरों के खिलाडी […]

शिवला मिळाली त्याची ड्रीम गर्ल?

मुंबई, २५ एप्रिल २०२३, प्रतिनिधी : रिअॅलिटी शो बिग बॉसचे कलाकार हे शो संपल्यानंतरही चर्चेत असतात. अलीकडेच बिग बॉस चा १६ वा सिझन संपला. हा सिझन देखील खूप गाजला. बिग बॉस मधील मंडळीला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.अशातच सध्या सोशल मीडियावर अभिनेता शिव ठाकरेशी संबंधित व्हिडिओ व्हायरल होत आहे.

शिव लवकरच रोहित शेट्टीच्या ‘खतरों के खिलाडी 16’ या शोमध्ये दिसणार आहे.पण अलीकडेच तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे प्रचंड चर्चेत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार शिव ठाकरे पुन्हा प्रेमात पडला आहे, अश्या चर्चा रंगू लागल्यात. अखेर शिवला त्याची ड्रिम गर्ल मिळाली आहे. शिव एका प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्रीला डेट करत असल्याचे म्हंटल जात आहे.

शिव अनेक वेळा त्याच्या लव्ह लाईफमुळे चर्चेत असतो. बिग बॉसमध्ये ही त्याने बऱ्याचदा सांगितले आहे की, तो सिंगल असून कोणाची तर वाट पाहत आहे. अशातच सध्या तो टीव्ही अभिनेत्री आकांक्षा पुरीला डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. त्या दोघांना बऱ्याचदा कार्यक्रमांमध्ये एकत्र स्पॉट केले आहेत.
या बातमीवर आता आकांक्षा पुरी हिने नुकताच खुलासा केला .अलीकडेच एका मुलाखतीत तिने याबाबत प्रतिक्रिया दिली. ती म्हणाली,” या बातम्या अर्थहीन आहेत, यावर मला हसू येत.” पुढे शिवविषयी बोलताना ती म्हणाली की, ‘डेटींगच्या बातम्यांमध्ये अजिबात तथ्य नाही’. शिव एक सुंदर आणि चांगला माणूस आहे पण दुर्दैवाने मला चांगली मुले मिळत नाहीत.” तिच्या या वक्तव्यानंतर आणखी चर्चा रंगू लागल्यात

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number