साईंच्या दरबारात रक्तदान शिबिराचे आयोजन

जय महाराष्ट्र न्यूज, अहमदनगर शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी आल्यानंतर रक्तदान करावं अशी मोहीम साईबाबा संस्थानमार्फत राबवली जात आहे. शिर्डीतील साईनगर मंदिरात रक्तदान महाशिबीराचं आयोजन करण्यात आलं. दिवसेंदिवस रक्ताची वाढती गरज लक्षात घेऊन रक्तदान चळवळ उभी करण्याचा निर्णय व्यवस्थापन समितीने घेतला आहे. या वर्षाच्या मे महिन्यापासून साईबाबा समाधी मंदिर परिसरात दररोज भक्तांकडून रक्तदान करवून घेतलं जात आहे. […]

साईंच्या दरबारात रक्तदान शिबिराचे आयोजन

जय महाराष्ट्र न्यूज, अहमदनगर

शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी आल्यानंतर रक्तदान करावं अशी मोहीम साईबाबा संस्थानमार्फत राबवली जात आहे. शिर्डीतील साईनगर मंदिरात रक्तदान महाशिबीराचं आयोजन करण्यात आलं. दिवसेंदिवस रक्ताची वाढती गरज लक्षात घेऊन रक्तदान चळवळ उभी करण्याचा निर्णय व्यवस्थापन समितीने घेतला आहे.

या वर्षाच्या मे महिन्यापासून साईबाबा समाधी मंदिर परिसरात दररोज भक्तांकडून रक्तदान करवून घेतलं जात आहे. शिर्डी दर्शनासाठी आलेल्या चला हवा येवु द्या फेम भारत गणेशपुरे यांनी देखील शिबीरात सहभागी होत रक्त दान केलय. तसेच, याठिकाणी आल्यानतंर एकदा तरी रक्तदान आवर्जून करण्याचं आवाहान भारत गणेशपुरे यांनी केलय. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number