जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
गेल्या नऊ महिन्यांत शिर्डी संस्थानच्या साईबाबा मंदिरात भक्तांनी दररोज सरासरी एक कोटी 52 लाख रुपयांचे दान अर्पण केले.
सात वर्षांपूर्वी साईबाबांच्या चरणी दररोज सरासरी 53 लाख रुपये दान केलं जायचे.
शिर्डी संस्थानकडे 2011 साली 535 कोटींची गंगाजळी होती ती आता 1600 कोटींवर जाऊन पोहोचली.
तर, दुसरीकडे सिद्धीविनायक मंदिरात दानाचा ओघ कमी झाला. 2015-16 मध्ये सिद्धिविनायक ट्रस्टकडे 80 कोटी 4 लाख रुपयांचा निधी जमा झाला होता.
एप्रिल 2016 ते डिसेंबर 2016 या 9 महिन्यांमध्ये फक्त 70 कोटी 70 हजार रुपयांचा निधी गोळा झाल्याची माहिती मिळत आहे.