जय महाराष्ट्र न्यूज, शिर्डी
अखेर शिर्डी विमानतळ अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर विमान वाहतुकीसाठी सज्ज झाले आहे.
येत्या 1 ऑक्टोबरला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते शिर्डी विमानतळाचे उद्घाटन होणार आहे.
शिर्डीहून 14 किलोमीटर अंतरावर असलेल्या काकडी गावात हे विमातळ आहे. हे विमानतळ सुरु झाल्यानंतर मुंबईहून शिर्डीला लागणारे पाच तासाचे अंतर 40 मिनिटांत पार करता येणार आहे.