शिर्डी विमानतळाचा ट्रायल

जय महाराष्ट्र न्यूज, अहमदनगर   साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीला जाणाऱ्या भाविकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आज दुपारी शिर्डी विमानतळाची ट्रायल घेतली जाणार आहे. एअर इंडियाची उपकंपनी असलेल्या अलायन्स एअरलाइन्स चे 72 सीटचे एक विमान मंगळवारी शिर्डी विमानतळासाठी ट्रायल घेणार आहे. मुंबई एअरपोर्टवरून हे विमान दुपारी 3.20 वाजता शिर्डीसाठी टेकऑफ घेईल आणि शिर्डीला 4 वाजता उतणार आहे. […]

शिर्डी विमानतळाचा ट्रायल

जय महाराष्ट्र न्यूज, अहमदनगर

 

साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीला जाणाऱ्या भाविकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आज दुपारी शिर्डी विमानतळाची ट्रायल घेतली जाणार आहे. एअर इंडियाची उपकंपनी असलेल्या अलायन्स एअरलाइन्स चे 72 सीटचे एक विमान मंगळवारी शिर्डी विमानतळासाठी ट्रायल घेणार आहे. मुंबई एअरपोर्टवरून हे विमान दुपारी 3.20 वाजता शिर्डीसाठी टेकऑफ घेईल आणि शिर्डीला 4 वाजता उतणार आहे. या विमानासोबत दिल्लीच्या नागरी उड्डान विभागाचे अधिकारी, तंत्रज्ञ आणि सुरक्षा अधिकारी यांचे पथक असणार आहे. विमानाचे टेकऑफ आणि लँडिंग व्यवस्थित होते की नाही, याची खातरजमा करुन तसेच सुरक्षा व्यवस्था कशी आहे, याची पाहणी करून आपला अहवाल नागरी विमान विभागाला संध्याकाळीच कळवण्यात येणार आहे.

1 ऑक्टोबर 2017 रोजी पासून शिर्डी साईबाबांच्या साई समाधी शताब्दी महोत्सवाची सुरुवात होत असून या साई समाधी शताब्दी महोत्सवाची सुरुवात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. याच वेळी शिर्डी विमानतळाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करून प्रवासी वाहतूक सुरू करण्याची जोरदार तयारी राज्य सरकारने चालविली आहे.

 

साईबाबा समाधी महोत्सवाचे औचित्य साधून भाविकांना विमान सेवा उपलब्ध करून देण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रयत्न आहे. 1 ऑक्टोबर 2017 रोजी सकाळी 11 वाजता देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद शिर्डीत पोहोचणार असून साई समाधीचे दर्शन घेऊन साई मंदिरातील लेंडीबाग येथे ध्वजारोहण करून साई समाधी शताब्दी उत्सवाची सुरुवात करणार आहेत.

शिर्डी साईबाबांच्या समाधीस 18 ऑक्टबर 2018 रोजी शंभर वर्ष पूर्ण होत असून 1 ऑक्टोबर 2017 ते 18 ऑक्टोबर 2018 पर्यंत हा साई समाधी शताब्दी उत्सव शिर्डीत चालणार आहे. साई समाधी शताब्दी उत्सवानिमित्ताने वर्षभर साईबाबांच्या पादुका भाविकांच्या दर्शना करिता देशभर फिरणार असून महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात तर देशातील प्रत्येक राज्यात बाबांच्या पादुका भविकांच्या दर्शनासाठी साई संस्थान विश्वस्थ घेऊन जाणार आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number