‘शिंदे गटाला अजित पवारांची धुणीभांडीच करावी लागणार’

आता अर्थमंत्री झालेल्या अजित पवारांची धुणी-भांडी केल्याशिवाय शिंदे गटाच्या आमदारांना पर्यायच नाही, अशी खोचक टीका ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केली आहे. धुणीभांडी करावीच लागणार अजितदादांच्या अर्थमंत्रीपदावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे की, मविआ काळात अजितदादांबद्दल आमदारांच्या तक्रारी होत्या. मात्र, तेव्हा मुख्यमंत्री असलेल्या उद्धव ठाकरेंनी या तक्रारींकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे बंड करावे […]

‘शिंदे गटाला अजित पवारांची धुणीभांडीच करावी लागणार’

आता अर्थमंत्री झालेल्या अजित पवारांची धुणी-भांडी केल्याशिवाय शिंदे गटाच्या आमदारांना पर्यायच नाही, अशी खोचक टीका ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केली आहे.

धुणीभांडी करावीच लागणार
अजितदादांच्या अर्थमंत्रीपदावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे की, मविआ काळात अजितदादांबद्दल आमदारांच्या तक्रारी होत्या. मात्र, तेव्हा मुख्यमंत्री असलेल्या उद्धव ठाकरेंनी या तक्रारींकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे बंड करावे लागले. आता परिस्थिती वेगळी आहे. आता मी मुख्यमंत्री आहे. त्यामुळे कोणावरही अन्याय होऊ देणार नाही. सर्वांना विकासासाठी निधी मिळेल. यावर संजय राऊत म्हणाले, एकनाथ शिंदेंना आता असे बोलल्याशिवाय पर्यायच नाही. वास्तवात निधी मिळवण्यासाठी शिंदे गटाला आता अजित पवारांची धुणीभांडी करावीच लागणार आहे.

देवेंद्र फडणवीसांवर टीका
अजित पवार यांना अर्थ खात्याचा दांडगा अनुभव आहे. गेल्या वर्षभरात या सरकारने केवळ उधळपट्टी केली आहे, असे म्हणत संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. तसेच, अजितदादांच्या कारभारावर मला विश्वास आहे. ते नक्कीच या उधळपट्टीला चाप लावतील, असा मला विश्वास आहे, असा टोलाही संजय राऊतांनी लगावला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number