सध्या सर्वत्र मंत्रिमंडळ विस्ताराबाबत बोलले जात आहे. त्यातच मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा करण्यासाठी शिंदे-फडणवीसांनी दिल्ली गाठली आहे. तर, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांची अमित शाहांशी दिल्लीत चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. शिवसेनेच्या वर्धापन दिनाआधी राज्य मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दिल्लीच्या बैठकीत मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती मिळाली असून या मंत्रिमंडळात महिलांनाही स्थान मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या तारखांवर तारखा समोर येत आहेत. मात्र आता शिवसेनेच्या वर्धापन दिनाआधी राज्य मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या बैठकीत मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
मंत्रिमंडळ विस्तार होणार का ?
मंत्रिमंडळ विस्तारासाठी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांची दिल्लीत चर्चा सुरु आहे. मंत्रिमंडळ विस्तारावर अमित शाहांशी चर्चा सुरु असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. १९ जून आधी मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता असल्याचेही समोर येत आहे. शिवसेनेच्या वर्धापन दिनाआधी विस्तार होण्याची शक्यता असल्याचेही सांगितले जात आहे. मंत्रिमंडळ विस्तारात नवोदित आणि महिलांना संधी मिळणार आहे. तसेच प्रभाव पाडू न शकणाऱ्या आणि वादग्रस्त मंत्र्यांना बाजूला केलं जाणार असल्याचेही समोर आले आहे. आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून विस्तार होणार आहे. तर, मंत्रिमंडळ विस्तार हा भाजपच्या मिशन ४५ ला अनुकूल ठरणार असल्याचेही सांगितले जात आहे.