शिंदे-फडणवीसांची ‘आशिकी’ सत्तेची

‘हम दो हमारे चालीस’चा प्रयोग सुरत-गुवाहाटी-गोवा असा चालला, पण मुंबईत येताच ‘हम दोनो’ वरच भागवावे लागले. शिंदे सरकारने ठाकरे सरकारचे निर्णय रद्द करून पुन्हा नव्याने निर्णय प्रक्रिया राबवल्याच्या मुद्द्यावरुन शिवसेनेनं नाराजी व्यक्त केली आहे. सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी न्यायप्रविष्ट असल्याने वेळकाढूपणा करण्याच्या दृष्टीने शिंदे आणि फडणवीस सरकार महाविकास आघाडी सरकारने घेतलेले निर्णय रद्द करुन पुन्हा तेच […]

शिंदे-फडणवीसांची ‘आशिकी’ सत्तेची

‘हम दो हमारे चालीस’चा प्रयोग सुरत-गुवाहाटी-गोवा असा चालला, पण मुंबईत येताच ‘हम दोनो’ वरच भागवावे लागले. शिंदे सरकारने ठाकरे सरकारचे निर्णय रद्द करून पुन्हा नव्याने निर्णय प्रक्रिया राबवल्याच्या मुद्द्यावरुन शिवसेनेनं नाराजी व्यक्त केली आहे. सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी न्यायप्रविष्ट असल्याने वेळकाढूपणा करण्याच्या दृष्टीने शिंदे आणि फडणवीस सरकार महाविकास आघाडी सरकारने घेतलेले निर्णय रद्द करुन पुन्हा तेच निर्णय घेत आहे, असं शिवसेनेनं म्हटलंय. त्याचप्रमाणे फडणवीस-शिंदे यांचे सरकार म्हणे बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने चालले आहे. ही त्यांची बतावणी म्हणजे ढोंग आहे, असंही शिवसेनेनं ‘सामना’च्या अग्रलेखामध्ये म्हटलंय

चित्रपटांच्या नावांचे संदर्भ देत शिवसेनेनं एकदम फिल्मी स्टाइल टीका या अग्रलेखातून केलीय. शिवसेनेनं या लेखामध्ये, ‘शिंदे-फडणवीस यांचे सरकार अस्तित्वात नाही’. ‘एक दुजे के लिये’ चित्रपटातील ‘वासू-सपना’ या प्रेमवीरांप्रमाणे हे दोघेच फिरतात, मजा मारतात, गाणी गातात, बागडतात. एकंदरीत त्यांच्या जीवनात नव्याने फुलबाग बहरली आहे, पण चित्रपटाच्या पडद्यावरील वासू-सपनाचे प्रेम अस्सल होते. तसे या वासू-सपनाचे आहे काय? स्वार्थ, दगाबाजीच्या पायावर त्यांचे नाते उभे आहे. त्यांची ‘आशिकी’ सत्तेची आहे. त्यांना खुर्चीचा ‘प्रेमरोग’ जडला आहे. खुर्चीलाच ‘अनारकली’ मानून त्यांच्या प्रेमाचे जप-जाप सुरू आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात ही नवी ‘लव्हस्टोरी-२२’ उदयास आली आहे. ते दोघे बीजवर आहेत. त्यातील एका गटाने तर शिवसेनेच्या नावाने आणाभाका घेऊन बांधलेले मंगळसूत्र ताडकन तोडले, पण तरीही शिवसेनेशिवाय त्यांचा दिवस उगवत नाही की मावळत नाही,” असं म्हटलंय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number