शिंदे, फडणवीस, अजित पवार एकाच मंचावर

मुंबई , ८ जुलै २०२३, प्रतिनिधी :  अजित पवार यांनी बंड केल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात अभूतपूर्व गोंधळ उडाला. अजित पवार यांच्यासोबत आलेल्या आठ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री असलेले महाराष्ट्रातील हे पहिलं सरकार आहे. या ट्रिपल इंजीन सरकारचा पहिला कार्यक्रम  (ता. ८) गडचिरोलीत होत आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दुसरे […]

शिंदे, फडणवीस, अजित पवार एकाच मंचावर

मुंबई , ८ जुलै २०२३, प्रतिनिधी :  अजित पवार यांनी बंड केल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात अभूतपूर्व गोंधळ उडाला. अजित पवार यांच्यासोबत आलेल्या आठ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री असलेले महाराष्ट्रातील हे पहिलं सरकार आहे. या ट्रिपल इंजीन सरकारचा पहिला कार्यक्रम  (ता. ८) गडचिरोलीत होत आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार गडचिरोलीत दाखल झाले आहेत. तेथे शासन आपल्या दारी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. पवार यांच्यासोबत शपथ घेतलेले कॅबिनेट मंत्री धर्मरावबाबा आत्राम या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

खासदार अशोक नेते, आमदार देवराव होली, माजी मंत्री शोभा फडणवीस, भंडाऱ्याचे आमदार नरेंद्र भोंडेकर, पोलिस अधीक्षक संदीप पाटील उपस्थित राहणार आहेत. गडचिरोली जिल्ह्याच्या सर्व तालुक्यांतील लाभार्थ्यांना ३०० बसेसद्वारे एमआयडीसी परिसरात कार्यक्रम स्थळी आणण्यात आले आहे. वेगवान आणि विकासाचे सरकार असल्याचा नारा देत अजित पवार बंड करून सत्तेत सहभागी झाले.

त्यानंतर त्यांचा हा पहिलाच विदर्भ दौरा आहे. आजच्या कार्यक्रमाचे आकर्षण म्हणजे विविध योजनांचा लाभ शासन येथे येऊन लाभार्थ्यांना थेट त्यांना देणार आहे. त्यासाठी जिल्हाभरातील लाभार्थी नागरिक गडचिरोलीत जमा झाले आहेत. शासन आपल्या दारी या उपक्रमासाठी राज्य सरकारने ६१९ कोटी रुपये मंजूर केले आहेत. गडचिरोली जिल्ह्यात आतापर्यंत ६ लाख ९७ हजार नागरिकांना विविध योजना आणि दाखल्यांचा लाभ देण्यात आला आहे. आजच्या कार्यक्रमामुळे इतरही योजना नागरिकांना घेणे सोयीस्कर होणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number