जय महाराष्ट्र न्यूज, रत्नागिरी
कोकणात शिमगोत्सव सुरूवात झालीय. कोकणातील शिमगोत्सव म्हणजे सामाजिक, सांस्कृतिक संस्कृतीचं दर्शन घडवणारा उत्सव मानला जातो.
शेकडो वर्षांच्या परंपरा आणि मानजपत प्रत्येक कोकणी माणूस या उत्सवात सहभागी होत असतो. या उत्सवादरम्यान सादर होणा-या लोककला म्हणजे कोकणचं वैभव असतं.
जे जे गैर आणि अनिष्ट आहे त्याचा नाश करण्याचा हा उत्सव ख-या अर्थाने कोकणच्या सांस्कृतिक वैभवाच दर्शन घडवतो.