“विकास होत नसल्यानं वेगळा विदर्भ हवा” – श्रीहरी अणे

जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर बुधवारी झालेल्या पवार आणि राज यांच्या मुलाखतीत पवारांनी वेगळा विदर्भ हिंदी भाषिकांची मागणी असल्याचा उल्लेख केला होता. त्यावरूण आता वेगळा वाद सुरू झाला आहे. मुलाखतीत अनेक विषयांवर चर्चा झाली होती. शरद पवारांच्या एकेका वक्तव्यावरूण त्यांच्या विरोधात सर्व बाजूने टिका उठल्या आहेत.‘विदर्भाचा विकास होत नाही म्हणून आम्हाला वेगळा विदर्भ हवा आहे आणि […]

“विकास होत नसल्यानं वेगळा विदर्भ हवा” – श्रीहरी अणे

जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर

बुधवारी झालेल्या पवार आणि राज यांच्या मुलाखतीत पवारांनी वेगळा विदर्भ हिंदी भाषिकांची मागणी असल्याचा उल्लेख केला होता. त्यावरूण आता वेगळा वाद सुरू झाला आहे. मुलाखतीत अनेक विषयांवर चर्चा झाली होती. शरद पवारांच्या एकेका वक्तव्यावरूण त्यांच्या विरोधात सर्व बाजूने टिका उठल्या आहेत.
‘विदर्भाचा विकास होत नाही म्हणून आम्हाला वेगळा विदर्भ हवा आहे आणि तोही हिंदी किंवा मराठी भाषिक आहे म्हणून नाही’ अशी टीका विदर्भवादी नेते श्रीहरी अणे यांनी शरद पवारांवर केली आहे. बुधवारी पुण्यात शरद पवार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुलाखत झाली. या मुलाखतीत राज ठाकरेंनी वेगळा विदर्भाच्या मागणी संदर्भात प्रश्न विचारला होता. यावेळी पवार यांनी वेगळ्या विदर्भाची मागणी हिंदी भाषीकांची असल्याचा उल्लेख केला होता. यासंदर्भात श्रीहरी अणे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

विदर्भवादी नेते श्रीहरी अणे यांनी म्हंटल की, मराठी माणसांमध्ये इतका मोठा न्यूनगंड कुठून आला कळत नाही, इतके मोठे नेते हिंदी भाषिकांच्या नेतृत्वाला स्वतःहून कमी समजतात. आम्हाला विदर्भात हा फरक कधीच जाणवला नाही, आम्ही मराठी आणि हिंदी दोन्ही बोलतो, आमच्यासाठी हिंदी नेतेपन तितकेच महत्वाचे आहेत जितके मराठी, महाराष्ट्राच्या एका ही मुख्यमंत्र्यांनी विदर्भाचा विकास केला नाही आणि या बद्दलच आमचं वाद आहे, विदर्भाचा विकास होत नाही म्हणून आम्हाला विदर्भ हवा आहे. हिंदी भाषिक किंवा मराठी भाषिक म्हणून नाही, असं त्यांनी म्हटल आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number