Shashank Ketkar Watermelon Video : ‘कलिंगड कापल्यानंतर त्यातून निघाले बुडबुडे…’, शशांक केतकरने शेअर केला धक्कादायक व्हिडीओ, दाखवली सत्य परिस्थिती

काही दिवसांपूर्वी मुंबईतील भेंडी बाजार भागात एका कुटुंबातील चार जणांचा कलिंगड खाल्ल्यानं मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. त्या चौघांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? पोलीस या संपूर्ण घटनेचा तपास करत आहेत. त्यामुळे आता कलिंगड खाताना प्रत्येकाच्या मनात भीती निर्माण झाली आहे.   अशातच आता अभिनेता शशांक केतकरचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये कलिंगडमध्ये केमिकल वापरलं गेलं […]

Shashank Ketkar Watermelon Video :  ‘कलिंगड कापल्यानंतर त्यातून निघाले बुडबुडे…’, शशांक केतकरने शेअर केला धक्कादायक व्हिडीओ, दाखवली सत्य परिस्थिती

काही दिवसांपूर्वी मुंबईतील भेंडी बाजार भागात एका कुटुंबातील चार जणांचा कलिंगड खाल्ल्यानं मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. त्या चौघांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? पोलीस या संपूर्ण घटनेचा तपास करत आहेत. त्यामुळे आता कलिंगड खाताना प्रत्येकाच्या मनात भीती निर्माण झाली आहे. 

 अशातच आता अभिनेता शशांक केतकरचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये कलिंगडमध्ये केमिकल वापरलं गेलं आहे,े याबद्दल सांगताना दिसत आहे. शशांक केतकरनं बाजारातील कलिंगडाचा व्हिडीओ शेअर केला आहे ज्यात ते कलिंगड केमिकलयुक्त असल्याचा दावा त्याने केला आहे.

शशांक केतकर व्हिडीओमध्ये म्हणत  आहे की, "मार्केटमध्ये सध्या कलिंगडं खूप खराब येत आहेत हे आपण बघतोय. मी आता एका दुकानात आहे. तिथे आम्ही एक कलिंगड पाहिलं आणि त्यातही ती केमिकल्स आहेत असं वाटतंय. कलिंगड कट केलंय त्यातून कसे बुडबुडे येत आहेत बघा. हे बुडबुडे दिसत आहेत ते केमिकलवाले आहेत."

त्याचप्रमाणे पुढे तो म्हणाला की, "सालीचा हिरवा रंग देखील दाखवला जो सामान्य कलिंगडाच्या रंगापेक्षा खूप वेगळा आहे.  "नेमकं खायचं काय हा प्रश्न आहे", असं कॅप्शन देत शशांकने त्याच्या स्टोरीवर हा व्हिडीओ शेअर केला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number