शेतकऱ्यांच्या कर्जमाफीनंतर शरद पवारांना वाटते या तीन शब्दांविषयी चिंता

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   सरकारने सरसकट, तत्वतः आणि निकष यांची व्याख्या स्पष्ट करावी असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हंटले आहे. इतचं नाही तर या तीन शब्दांविषयी त्यांना चिंता वाटत आहे.   शेतकऱ्यांची एकजूट ही समाधानकारक बाब आहे. सुकाणू समिती सगळे मतभेद दूर करून एकत्र आली आणि शेतकऱ्यांच्या पदरात सकारात्मक मिळाले.   शिवाय सरकारनेही […]

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीनंतर शरद पवारांना वाटते या तीन शब्दांविषयी चिंता

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

सरकारने सरसकट, तत्वतः आणि निकष यांची व्याख्या स्पष्ट करावी असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हंटले आहे. इतचं नाही तर या तीन शब्दांविषयी त्यांना चिंता वाटत आहे.

 

शेतकऱ्यांची एकजूट ही समाधानकारक बाब आहे. सुकाणू समिती सगळे मतभेद दूर करून एकत्र आली आणि शेतकऱ्यांच्या पदरात सकारात्मक मिळाले.

 

शिवाय सरकारनेही सरसकट कर्जमाफीचा निर्णय घेतला, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सरकार आणि सुकाणू समितीचं अभिनंदन केले.

 

दोन प्रकारचे कर्ज असतात. एक अल्प मुदतीचं कर्ज असतं आणि दुसरं दीर्घ मुदतीचं कर्ज असंत. मात्र, सरकारने सरसकट कर्जमाफी केली आहे. त्यामुळे सर्वांचंच कर्ज माफ होईल, म्हणून सरकार अभिनंदनाला पात्र आहे असेही पवारांनी म्हंटले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number