शारदाश्रम शाळेची मुजोरी, शाळेतून विद्यार्थ्यांना पुन्हा काढलं

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   दादर आणि परिसरातल्या अनेक मध्यमवर्गीय मुलांसाठीची शाळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शारदाश्रम विद्यामंदिराची पुन्हा एकदा मुजोरी दिसून आली.   आज पुन्हा विद्यार्थ्यांनी शाळेची फि न भरल्यानं शाळेबाहेर काढण्यात आलं. त्यामुळे पालक- विद्यार्थी शाळेबाहेर तात्कळत उभे होतं. मात्र, मनसे नेते संदीप देशपांडे यांच्या मध्यस्थीमुळे या विद्यार्थ्यांनी पुन्हा वर्गात घेण्यात आलं.   दरम्यान, […]

शारदाश्रम शाळेची मुजोरी, शाळेतून विद्यार्थ्यांना पुन्हा काढलं

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

दादर आणि परिसरातल्या अनेक मध्यमवर्गीय मुलांसाठीची शाळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शारदाश्रम विद्यामंदिराची पुन्हा एकदा मुजोरी दिसून आली.

 

आज पुन्हा विद्यार्थ्यांनी शाळेची फि न भरल्यानं शाळेबाहेर काढण्यात आलं. त्यामुळे पालक- विद्यार्थी शाळेबाहेर तात्कळत उभे होतं. मात्र, मनसे नेते संदीप देशपांडे यांच्या मध्यस्थीमुळे या विद्यार्थ्यांनी पुन्हा वर्गात घेण्यात आलं.

 

दरम्यान, 17 जुलैलाही सिनिअर केजीतील मुलांना बाहेर काढलं होतं. शाळा व्यवस्थापनाने नर्सरी ते बालवर्गाच्या फीमध्ये कोणतीही पूर्वसूचना न देता तब्बल 66 टक्क्यांनी वाढ केली.

 

पूर्वीची 25,200 रुपये फी 42 हजार करण्यात आली. वाढीव फी न भरणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेत बसू न देण्याचा निर्णय शाळेने घेतला. त्यामुळे शाळा प्रशासनाने आठ दिवसाची मुदत फि भरण्यासाठी दिली होती.

 

त्यामुळे शिक्षणमंत्री विनोद तावड़े यांच्याकड़े सुद्धा बैठकीत ठेवण्यात आली होती. पण यावेळी शाळा प्रशासनाने दांडी मारली होती. मात्र, यावर अजुन काहीच तोडगा निघाला नाही आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number