शरद पवारांच्या भाषणातील संदर्भाने नवा वाद

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या भाषणाचा व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे. भाजप महाराष्ट्राच्या अधिकृत अकाऊंटवरून पोस्ट करण्यात आला. दरम्यान, शरद पवारांच्या भाषणातील संदर्भाने नवा वाद होण्याची शक्यता आहे. भाजपा महाराष्ट्राच्या ट्विटर हॅंडलवरून शरद पवार यांचा साताऱ्यातील भाषणाचा व्हिडिओ ट्विट करण्यात आला आहे. यामध्ये पवारांनी हिंदू देवदेवतांचा कशाप्रकारे अपमान केला आहे, हे भाजपाकडून […]

शरद पवारांच्या भाषणातील संदर्भाने नवा वाद

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या भाषणाचा व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे. भाजप महाराष्ट्राच्या अधिकृत अकाऊंटवरून पोस्ट करण्यात आला. दरम्यान, शरद पवारांच्या भाषणातील संदर्भाने नवा वाद होण्याची शक्यता आहे.

भाजपा महाराष्ट्राच्या ट्विटर हॅंडलवरून शरद पवार यांचा साताऱ्यातील भाषणाचा व्हिडिओ ट्विट करण्यात आला आहे. यामध्ये पवारांनी हिंदू देवदेवतांचा कशाप्रकारे अपमान केला आहे, हे भाजपाकडून दाखवण्यात आले आहे.

यावर, शरद पवार यांनी स्पष्टीकरण दिले आहे. पवार म्हणातात, त्यांनी कवीची भावना मांडली आहे.

भाजपाने ट्विट केलेल्या व्हिडिओमध्ये, शरद पवारांनी हिंदू देवी देवतांचे बाप काढले आहेत. शरद पवार नेहमीच हिंदू धर्माचा द्वेष करतात. पवारांनी हिंदू धर्माची बदनामी केली नसती, जातीवाद केला नसता, देवीदेतांचा अपमान केला नसता, तर ते एवढे मोठे झालेच नसते. पवार साहेब या वयात आपल्याला शोभेल असेच वक्तव्य करा, असे भाजपने केलेल्या ट्विटमध्ये म्हणण्यात आले आहे.

पवारांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादीची भूमिका

दरम्यान, ‘आम्ही तुमच्या देवाचे बाप’ या शरद पवारांच्या भाषणातील वक्तव्यावरून नवा वाद पेटला आहे. यावर राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी ‘जय महाराष्ट्र’ वृत्त वाहिनीला प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, ‘भाजप आता तोड-मोडके-जोडके-बोल अशा भूमिकेत असून विधानांचे वेगवेगळे अर्थ काढत आहे. पवारांनी कवी जवाहर राठोड यांनी लिहिलेल्या कवितेचा उल्लेख भाषणात केला आहे. या कवितेत म्हटले आहे की, आम्ही मूर्ती चीनी हातोड्यापासून वापर करून मूर्तीला आकार देतो. म्हणजे थोडक्यात आम्ही त्यांचे बाप असं होतं. परंतु पवार हिंदू धर्माची बदनामी करतात, असा आरोप भाजप करत आहे. महाराष्ट्राच्या जनेतला पवारांचे राजकीय, धार्मिक, सामाजिक विषय माहित आहे. मात्र, भाजपने पवारांची तेवढीच ओळ ट्विट केली असून लोकांमध्ये संभ्रम निर्माण केला आहे. शरद पवारांचे पूर्ण भाषण टाकले असते तर हा वाद निर्माण झाला नसता, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी प्रवक्ते महेश तपासे यांनी दिली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number