जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी ऊस उद्योगाबाबत पंतप्रधान मोदींना लिहिलेल्या पत्राची तातडीनं दखल घेतलीय. यासंदर्भात सायंकाळी 6 वाजता नितीन गडकरींच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत बैठक होणार आहे. या बैठकीत कृषीमंत्री राधामोहन सिंग, रामविलास पासवान उपस्थित राहणार आहेत.
साखर निर्यातीसाठी मदत करावी, इथेलॉनचे भाव वाढवावेत, तसेच साखरेपासून उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना सेस लावावा, असे काही मुद्दे पत्राद्वारे केंद्राला सुचवले आहेत. या बैठकीत सकारात्मक निर्णय होईल अशी अपेक्षा शरद पवार यांनी व्यक्त केली असून साखर कारखानदार आणि ऊस उत्पादक शेतकरी यांचे लक्ष लागून राहिले आहे.